संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पुजनीय भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना संपन्न
– महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट कामगारांचा सत्कार
कामठी :- कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सामाजिक व आर्थिक मागासलेल्या कामगारांच्या सबलीकरण करण्याकरिता अमुल्य असे योगदान दिले. कर्मवीर दादासाहेब कुंभारे आंबेडकरी चळवळीचे एक प्रामाणिक व समर्पित योध्दा होते. त्यांचे जीवनकार्य हे प्रेरणादायी असल्याचे मनोगत महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
दिवंगत कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या १०२ व्या जन्म दिना निमित्त ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला महसुल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. या वेळी त्यांनी कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या कार्याबद्दल वरील गौरवोद्गार केले.
या प्रसंगी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते उत्कृट कामगार म्हणुन सुनिल वानखेडे व संगीता मानवटकर यचि शॉल व दादासाहेब कुंभारे स्मृतिचिन्ह देवून सत्कार केला.
तत्पूर्वी सकाळी १०:०० विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे पुजनीय भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसनाचा कार्यक्रम संपन्न झाला. ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते पुजनीय भिक्षु संघाला भोजनदान व धम्मदान देण्यात आले.
विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील धम्मसेवक व धम्मसेविका, ओगावा सोसायटीचे पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येशील पदाधिकारी, हरदास विद्यालय ड्रैगन इंटरनॅशनल स्कुल (CBSE) दादासाहेब कुंभारे विद्यालय, मेरी दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र येथील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, निर्धार महिला व बाल विकास समिती, बहुजन रिपब्लिकन एकता मंच इत्यादीच्या वतीने सुध्दा कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.