कायदेविषयक व विविध शासकीय योजनांचा महामेळावा 13 नोव्हेंबर रोजी संपन्न

भंडारा, दि. 14 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 13 नोव्हेंबर 2022 रोजी जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रूग्णालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य विभाग, कामगार कार्यालय, उप प्रादेशीक परिवहन, पंचायत समिती, अपंग महामंडळ, तहसील कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र व विविध शासकीय कार्यालयामार्फत जनतेला विविध योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने 40 स्टॉल लावण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेश अस्मर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कटकडे, प्राचार्य जे. एम. पटेल महाविद्यालय डॉ. कार्तिक पन्नीकर, कार्यक्रमाचे आयोजक सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बिजु बा. गवारे, अध्यक्ष जिल्हा अधिवक्ता संघ आर. बी. वाढई, भंडारा जिल्हयातील सर्व माननीय न्यायीक अधिकारी, जिल्हा वकील संघ, भंडाराचे अधिवक्तागण, जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालयांचे प्रमुख, सर्व न्यायालयीन कर्मचारी व शासकीय योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश अस्मर यांनी प्रत्येकाला आपल्या अधिकारांची जाणीव असणे आवश्यक आहे म्हणून या महाशिबिराच्या माध्यमातून आपले अधिकार तसेच विविध शासकीय योजनांबाबत माहिती करून घ्यावी. सर्व पात्र नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा तसेच जिथे सामान्य नागरिकाचा हक्क हिरावला जात असेल किंवा त्यांच्यावर अन्याय होत असेल तर विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधन्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा बिजु बा. गवारे, यांनी केले. यावेळी त्यांनी विधी सेवा शिबिरांद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान 31 ऑक्टोबर पासून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती व शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांना कायदेविषयक तसेच त्यांचे हक्काबाबत जाणीव करून देणे या अभियानाचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी शासकीय योजना सामान्य नागरिकांना मिळवून देण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची असून त्यासाठी त्यांनी गावोगावी भेट देवून ते त्यांना मिळवून देण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन मुख्य न्यायदंडाधिकारी ए. के. आवारी तर आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, भंडारा ( जलदगती न्यायालय )पी. पी. देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देवून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. सर्व शासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पॉम्पलेट व बुकलेटच्या माध्यमातून नागरिकांना दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खेळणी दान उपक्रमाला चांगला प्रतिसाद

Mon Nov 14 , 2022
● बालदिन: लहान मुलांनी त्यांच्या पालकांसह मेट्रो राईड केली ● मोठ्या प्रमाणात खेळणी एकत्रित नागपूर :- सोमवारी बालदिनानिमित्त चिमुकल्यांनी आपल्या पालकांसह मेट्रोच्या प्रवासाचा आनंद लुटला. याशिवाय मूकबधिर शाळा आणि मुलांची शाळा या मुलांनी मेट्रोचा प्रवास केला. https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी दिलेल्या सायकल चालवून आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे मूकबधिर शाळेतील मुलांनी पहिल्यांदाच मेट्रो ट्रेनमधून प्रवास केला. मुलांच्या सोबत पालक आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com