संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज,मुखेड,धुळे आदी ठिकाणी पत्रकारावर झालेले हल्ले तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांत खूपच वाढ झाली आहे.यासंदर्भात कामठी पत्रकार संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून पुरोगामी राज्यात पत्रकारावर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासह पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या करून पत्रकारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी कामठी पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.