संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– स्मार्ट पोलिसांना लागेना 9 वर्षीय सुजल वासनिक चा सुगावा
कामठी :- राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूर व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रातील व गृहक्षेत्रा नजीकच्या कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या लिहिगाव येथील मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील चौथ्या वर्गात शिकणारा 9 वर्षीय बालक सुजल नेपाल वासनिक घरासमोर लहान भावासोबत खेळता खेळता हरविल्याची घटना भरदिवसा 16 सप्टेंबर 2018 ला दुपारी चार दरम्यान घडली होती आज या घटनेला सहा वर्षेचा काळ लोटला मात्र नागपूरच्या या स्मार्ट पोलिसांना सुजल वासनिक चा सुगावा लावण्यात अपयश प्राप्त झाल्याची शोकांतिका आहे.
सदर घटना घडली असता फिर्यादी सुजल चे वडील नेपाल वासनिक ने स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली होती मात्र पोलिसांना अपयश प्राप्त झाले होते.मात्र या प्रकरणात शेजारी आरोपी सुनील मडावी नामक इसमाने घटनेदरम्यान सुजल वासनिक च्या नातेवाईक सागर बागडे यांच्या भ्रमणध्वनी क्र 7875504018 द्वारे संपर्क साधुन मुलाला परत देतो अशी बतावणी केली मात्र त्या बदल्यात मला 10 लक्ष रुपये द्या अशी मागणी केली होती मात्र इतकी मोठी रक्कम शक्य नसल्याने मुलाच्या नातेवाईकांनी चार लक्ष रुपयात सौदा केला व नियोजित बोलीनुसार तारसा येथील पुलिया जवळ पैसे पोच करण्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी यशस्वी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात यश गाठले मात्र त्यावेळी आरोपी कडून सुजलबाबत कोणतीही ठोस माहिती काढण्यात पोलिसांना यश आले नाही .तर या आरोपी रामदास मडावी ने नविन कामठी पोलीस स्टेशन च्या पोलीस कोठडीतच स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.आज या प्रकरणाला सहा वर्षे लोटून गेले मात्र विविध घटनेत यशस्वी कामगिरी राबविल्या संदर्भात स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या स्मार्ट पोलिसांना बेपत्ता सुजल वासनिकचा शोध लावण्यात अपयश प्राप्त झाले ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल तेव्हा बेपत्ता असलेला हा 9 वर्षोय सुजल वासनिक सुरक्षित आहे का?या चिंतेत सुजल चे आई वडील अजूनही चिंतेत आहेत मात्र सी पी डॉ रवींद्र सिंघल यांच्या कारकिर्दीत या सुजल वासनिक प्रकरणाचा पर्दाफाश व्हावा अशी मागणी येथील सुजाण नागरिक करीत आहेत.