हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार  – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

– विकासासाठी जनतेला डबल इंजिन सरकारच हवे

मुंबई :- हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार, महायुतीचा प्रचंड विजय होणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात  बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उघडा पडला, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

बावनकुळे म्हणाले की, हरियाणामध्ये भाजपाची सत्ता स्थापन होत आहे. जम्मू – काश्मीरमध्येही भाजपाला मोठे यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली होती. मात्र आता विरोधकांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. मोदी सरकारच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देत जनतेने भरभरून भाजपाच्या पारड्यात मतदान केले म्हणून हरियाणा, जम्मू – काश्मीरमध्ये इतके मोठे यश मिळाले आहे.

राहुल गांधी यांचे अमेरिकेतील आरक्षणाबाबतचे वक्तव्य ऐकल्यानंतर काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला आहे.जीविताचे, मालमत्तेचे तसेच संविधानाचे रक्षण केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटणार आहेत. राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मतदारही महायुतीला विजय प्राप्त करून देतील. विरोधकांचे घाणेरडे राजकारण महाराष्ट्रामध्ये हाणून पाडण्यासाठी ‘भाजपा घर चलो अभियान’ राबविणार आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचून काँग्रेसने निर्माण केलेला संभ्रम दूर करून राज्य आणि केंद्र सरकारची विकासकार्ये पोहोचवेल. विरोधकांचे जातीपातीचे राजकारण हद्दपार करून सर्व समाजांना एकत्र ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहील. आत्मपरिक्षणाची वेळ आता काँग्रेसवर आली आहे. भाजपाला विजयाचा उन्माद नाही की पराजयाने आम्ही खचत नाही. अंत्योदयाच्या भावनेने भाजपा सतत कार्य करत आहे असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बल्लारपूर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून खेळाडू घेतील आंतरराष्ट्रीय भरारी - पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

Tue Oct 8 , 2024
– 1 कोटी 78 लक्ष रुपयांच्या स्टेडियमच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन बल्लारपूर :- बल्लारपूर विधानसभेसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत. त्यांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात आता बल्लारपूर येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित करण्यात येणार आहे. या स्टेडियमचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. उद्या याच स्टेडियममधून बल्लारपूर विधानसभेतील खेळाडू आंतरराष्ट्रीय भरारी घेतील, असा विश्वास राज्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!