ऐतिहासिक गांधीसागर तलावाला मिळणार ‘हेरिटेज लूक’

– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली कामाची पाहणी

नागपूर :- नागपूर शहराच्या हृदयस्थानी असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण कार्य सुरू असून या ऐतिहासिक तलावाला ‘हेरिटेज लूक’ देण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरूवारी (ता. २८) तलावाच्या कामाची पाहणी केली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, धंतोली झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, कार्यकारी अभियंता उज्ज्वल धनविजय, संदीप लोखंडे, माजी नगरसेवक  प्रमोद चिखले आदी उपस्थित होते.

प्रकल्पाची प्राकलन राशी ४९.८२ कोटी रुपये एवढी असून यामध्ये महाराष्ट्र शासनाचा हिस्सा ७५ टक्के व मनपाचा २५ टक्के हिस्सा आहे. सदर प्रकल्पामध्ये तलावाच्या एका बाजूला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प देखील उभारण्यात येत आहे. तसेच तलावालगतच्या परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी प्रसाधनगृहांची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

प्रकल्पाचे सौंदर्यीकरण खुलून दिसावे व आकर्षक वाटावे याकरिता काही बाबी प्रकल्पात अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रकल्पामध्ये विद्युत रोषणाई, उत्तर आणि पूर्व दिशेच्या पाथ वे मधील सुशोभिकरण, फुटओव्हर ब्रिजवरील स्टॅम्पींग व ग्रील, जॅकवेल रिपेअरिंग व विसर्जन टँकचे सुशोभिकरण, भाउजी पागे उद्यान येथील सुशोभिकरण, तलावाच्या सर्व बाजूने (Eichhornia) फिल्टर मिडीया जेणेकरुन कुठलेही पाणी तलावात जाताना स्वच्छ होवून तलावाच्या पाण्यात एकत्रित होईल, उत्तर दिशेकडील पाथ वे वर प्रस्तावित केलेल्या झाडांसाठी ठिंबक सिंचन योजना तयार करणे. तसेच तलावाच्या दक्षिण दिशेस अतिवृष्टीमुळे अंदाजे ४६ मीटर लांबीची जुनी UCR भिंत कोसळलेली असल्याने भिंतीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. ही सर्व कामे सुरू असून संपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नव्या वर्षात टँकमुक्त नागपूरचा निर्धार

Fri Dec 29 , 2023
– ७५ टाक्यांमधून शहराला पाणीपुरवठा : निर्माणाधिन टाक्यांचे काम होणार लवकरच पूर्ण नागपूर :- नव्या वर्षात नागपूर शहर टँकरमुक्त करण्याचा निर्धार नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेला आहे. नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये सध्या ७५ टाक्यांमधून पाणीपुरवठा होत आहे. झोनस्तरावर एकूण १८ टाक्या (जलकुंभ) निर्माणाधिन असून त्या नव्या वर्षात कार्यान्वित होणार आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात निर्माणाधिन टाक्यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com