आजपासून दापोरी येथे श्री संत लालदास बाबांच्या १०५ व्या भव्य पुण्यतिथी महोत्सवास सुरुवात ! 

– ई. सन १९२० पासून लालदासबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची परंपरा ! 

– पुण्यतिथी महोत्सवानिमित्त उसळणार लाखो भक्तांचा जनसागर ! 

मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील दापोरी या गावाला श्री संत लालदासबाबा यांनी आपली कर्मभूमी निवडून विशेष कार्य केले. त्यामुळे दापोरी या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे . श्री संत गजानन महाराज यांच्या समकालीन कालखंडात दापोरी येथे प्रगट झालेले श्री संत लालदास बाबा यांचा १०५ वा भव्य पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २५ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत मोठ्या उत्साहात दापोरी नगरीत संपन्न होणार आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदासबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा कारण्याकरिता दापोरी नागरीमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून व परिसरातील पंचक्रोशीतील लाखो भाविक सहभागी होत असून चैत्र शुद्ध चतुर्थीला लालदासबाबा यांच्या समाधीचा अभिषेक करून तिर्थस्थापणेने या महोत्सवाची सुरुवात करण्यात येत असून फाल्गुन कृष्ण द्वादशी पासून सुरु होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात काकडा, आरती, भागवत प्रवचन, हरिपाठ, अखंड विना वादन, कीर्तन, आरती, भजन, यासह विविध कार्यक्रम व नवनवीन स्पर्धांचे उपक्रम राबविले जातात . दापोरी नगरीमध्ये लालदासबाबा बद्दल श्रद्धेची भावना असून या पावन भूमीत पुण्यतिथी महोत्सवाला येणाऱ्या लाखो भक्तांची प्रचंड वर्दळ असते.

दापोरी येथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदास बाबा यांचा १०५ वा भव्य पुण्यतिथि महोत्सव दापोरी नगरीमध्ये सालाबादा प्रमाने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असून या महोत्सवा निमित्य संगीतमय सदृश्यमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह मोठ्या उत्साहात सुरु होणार असून ह भ प स्वामी मुकुंद महाराज धोटे भागवताचार्य यांच्या मधुर वानीतून सुरु होणार आहे .

या पुण्यतिथी माहोत्सवा निमित्य दापोरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दापोरी नगरी मधे आनंदाचे व उत्साहचे वातावरण असून रोज हरिपाठ ,काकड़ा आरती , सत्संग , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रार्थना , खंजेरी भजन , अवधुति भजन , यासारखे विवध धार्मिक कार्यक्रम बाराही महिने सुरु राहत असून या भगवत सप्ताहाला रोज हजारो भक्तांचा प्रतिसाद मिळत असून दापोरी नगरीमधे १ एप्रिल रोजी श्री संत लालदासबाबा यांच्या पालखिचि भव्य शोभायात्रा मिरवणूक निघणार असून श्री संत लालदास बाबा यांच्या पुण्यतिथि महोत्सवाला लाखो भक्तांचा जनसागर उसळणार आहे . लालदास बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संखेणे उपस्थित राहन्याचे आवाहन श्री संत लालदास बाबा संस्थान तर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असणेची गरज - डॉ.दिपक सेलोकर यांचे प्रतिपादन

Tue Mar 25 , 2025
– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम नागपूर :- रुग्णालयात येणाऱ्या क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी केले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.24) केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिम तसेच 24 मार्च रोजीच्या जागतिक क्षयरोग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!