सद्भावना दिनानिमित्त राज्यपालांनी दिली सद्भावना प्रतिज्ञा

– दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन

मुंबई :- दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.

राज्यपालांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

“जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची” प्रतिज्ञा राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना दिली.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे व सहसचिव श्वेता सिंघल उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ साजरा

Tue Aug 20 , 2024
नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात आज ‘सद्भावना दिवस’ साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती देशभर सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते. या औचित्याने आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतीयेळे यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांना सद्भावना दिवसाची शपथ दिली. उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसिलदार आर.के.दिघोडे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी यावेळी उपस्थित होते. Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com