मुंबई :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पिंपळखुटा येथे खासगी बसला अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हृदय पिळवटून टाकणारे आहे. दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या तीव्र शोकसंवेदना मृतांच्या आप्तेष्टांना कळवतो. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.