भंडारा :- शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.लवकरच जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सुक्ष्म नियोजन करण्यासाठी एकुण 40 नोडल अधिका-यांना जबाबदा-यांचे वाटप करण्यात आले आहे.त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे स्थळ ठरविण्यासाठी मुख्याधिकारी भंडारा व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्थळ पाहणी करून तसा अहवाल दयावा. प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध शासकीय योजनेचे लाभ तसेच दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ वाटप होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावर सूक्ष्म नियोजन सुरू असून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सर्व विभागांची बैठक यासाठी आयोजित केली आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या उपक्रमांमध्ये शासनाच्या विविध विभागांच्या लाभांचे वाटप शिबिरांच्या माध्यमातून तसेच गावागावात नागरिकांच्या दारी जाऊन त्यांना प्रशासनामार्फत दाखले देण्यात आलेले आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाकडे कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या पद्धतीने झाले असून भंडारा जिल्ह्यातही या कार्यक्रमाचे करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.