नागपूर :- महानगरपालिका नागपूर यांचे राम जोशी, अतिरिक्त आयुक्त यांच्या आवाहनाला प्रगल्भ स्वयंसेवी संस्था यांनी प्रतिसाद देवुन 11 क्षयरूग्णांना दत्तक घेवुन एक संजिवनी देण्याचे कार्य केले. यात 11 क्षयरूग्णांपैकी एका क्षयरूग्णाने प्रगल्भ स्वयंसेवी संस्थेचे आभार मानुन मनोगत व्यक्त केले व ती या त्रासातुन तिला पोषण आहार औषधोपचारा दरम्यान किती मदतीचा ठरला याबद्यल तिने स्वतःचे मनोगत बोलुन व लिहुन विभागास कळविले.
मी आचल 19 वर्ष (काल्पनिक नाव) मी एक क्षयरूग्ण होती. मला या रोगाची बाधा झाली हे कळल्याबरोबर माझी मानसिक स्थिती फार ढासळली. त्यात माझी आर्थिक स्थिती पण फार हलाखीची होती. या आजाराच्या औषधोपचाराकरीता शासकीय स्तरावरील महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इंदिरा गांधी रूग्णालय, गांधी नगर, म.न.पा.नागपूर येथे गेली असता मला शासकिय स्तरावर माझी सर्व तपासणी व औषधोपचार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत सर्व निःशुल्क स्वरुपात प्राप्त झाल्या. त्यात मला डॉ. जाधव यांनी मानसीक आधार देवुन जर तु सहा महिने पुर्ण औषधोपचार केला तर हा आजार पुर्णपणे बरा होवु शकतो असे सांगितले. हे औषध तिव्र प्रभावशाली असल्यामुळे त्याकरीता तुला योग्य आहार घेणे फार गरजेचे आहे परंतु माझ्या घरची परिस्थिती फार हालाखी ची असल्यामुळे मी किती पौष्टीक आहार घेवु शकेल याचा मला विचार आला. असे असतांना राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत क्षयरूग्णांकरीता अतिरिक्त आयुक्त आवाहन केल्याप्रमाणे प्रगल्भ स्वयंसेवी संस्थे अंतर्गत क्षयरूग्णांना पोषण आहार किट पुरविण्यात येते असे समजले व त्याच प्रगल्भ स्वयंसेवी संस्थेने मला सुध्दा सहा महिन्यांकरीता दत्तक घेवुन पोषण आहार पुरविला. या पोषण आहाराची मदत झाल्यानंतर माझ्या वजनात वाढ होवुन माझ्या तब्येतीत सुधारणा होत गेली तसेच पोषण आहार मिळत गेल्यामुळे औषधांचे ईतर त्रास उपचारादरम्यान कमी जाणवले व सहा महिने माझा उपचार मी पुर्ण करू शकले व इंदिरा गांधी रूग्णालय, मनपा, नागपूर मधिल डॉ. जाधव यांनी मी पुर्णपणे बरी झालेली असे सांगितले त्यामुळे मला खुप आनंद आणि समाधान मिळाले. त्यामुळे मी प्रगल्भ स्वयंसेवी संस्था यांचे फार मनापासुन आभार व्यक्त करते तसेच इंदिरा गांधी रूग्णालय, म.न.पा. नागपूर अंतर्गत असणारे टीबी कर्मचारी यांचे आभार व्यक्त करते तसेच माझ्यासारखेच अन्य क्षयरूग्णांना दत्तक घेवुन पोषण आहार देण्याकरीता समाजातिल ईतर स्वयंसेवी संस्था व दान दात्यांनी नि-क्षय मित्र म्हणुन मदतीचा हात दयावा जेणेकरून माझ्यासारखे रूग्ण बरे होवुन सुदृढ व आरोग्यदायी जीवन जगु शकेल व तसेच भारत क्षयमुक्त होण्यास मदत होईल.
आज दि. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्याने इंदिरा गांधी रूग्णालय क्षयरोग पथक, म.न.पा., नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात या क्षयरूग्णाने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नागपूर महानगरपालिका कार्यक्षेञात पुढील नि-क्षय मित्रांचा सुध्दा सहभाग उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (100), सहयोग फाउंडेशन (61) सेवा फाउंडेशन (27), उज्वल पगारीया (250) सुद चॅरीटेबल फाउडेशन (15) स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था (61) मॉईल लिमीटेड (29) नरेंद्र जिचकार (32) नागी हिराजी धर्मार्थ ट्रस्ट (50) चरावती फाउडेशन (50) गरज फाउडेशन (10) अपोला टायर्स फाउडेशन (5) प्राप्त झालेला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, म.न.पा., नागपूर, डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी, म.न.पा., नागपूर, डॉ. संगिता खंडाईत वैद्यकिय अधिक्षक, आय.जी.आर. व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे कर्मचारी उत्तम मधुमटके, डीपीएस, नितीन बावणे, एस.टी.एस. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. “YES ! WE CAN END TB”