रामदास मेश्राम यांच्या कुटुंबीयांनी स्मृतिदिनी केला देहदान-अवयवदान संकल्प

– वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनदान

– मेश्राम कुटुंबीयांनी जपला मानवतावादी विचारांचा आदर्श

रामटेक :- ५ जुलै २०२३ नागपूर येथील मानवतावादी, सामाजिक विचारांचे पुरस्कर्ते ज्येष्ठ समाजसेवक स्मृतिशेष रामदास मेश्राम यांच्या स्मृतिदिनानिमित्त ५ जुलैला ‘आरिकाता सुझुए’ वृद्धाश्रम, मनसर येथे देहदान, अवयवदान संकल्प नोंदणी व वृद्धांना भोजनदान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार यांनी बोलताना, “रामदास मेश्राम यांनी दिलेला सामाजिक विचारांचा वारसा कुटुंबाद्वारा जपला जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करत संकल्पकर्त्यांचे अभिनंदन केले.” “भारतीय समाजात मानवतावादी व सामाजिक विचारांच्या रुजवणीसाठी आकाशझेप फाऊंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान उत्तम कार्य करीत असल्याचे” मत मार्गदर्शक चेतन मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव साक्षोधन कडबे यांनी केले तर देवेंद्र मेश्राम यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक व स्मृतिशेष रामदास मेश्राम यांच्या पत्नी कमल मेश्राम, मुलगा देवेंद्र मेश्राम, चेतन मेश्राम, भाऊ हरिदास मेश्राम, श्रावण मेश्राम, भानुदास मेश्राम, सून भावना मेश्राम, तक्षशिला मेश्राम, द्वारका मेश्राम, विमल मेश्राम तसेच कुटुंबातील वंदना पात्रे, मंजुषा बनसोड, आरती बनसोड, प्रणय डहाट, सोनू बनसोड, संजय गायकवाड व आकाशझेपचे संचालक वैभव तुरक, सदस्या सविता सोलंकी यांनी मरणोपरांत देहादन व अवयवदान संकल्प नोंदणी करून मानवता आणि राष्ट्रीयतेचा कृतिशील संदेश दिला. आकाशझेप तर्फे संकल्प कर्त्यांना शाल, पुष्परोपे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मेश्राम परिवरातर्फे वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांना भोजनदान देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मिलन पाटील, आतिश मेश्राम, वृद्धाश्रमाचे संचालक भोला रामटेके, आकाशझेपचे पंकज माकोडे, सुमेध गजभिये, महादेव सरभाऊ, श्याम धूवे, शंकर आहाके, नंदकिशोर कुंभरे, अनुराग गजभिये आणि मेश्राम परिवारातील समस्त सदस्यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा वैद्यकीय आघाडीद्वारे डॉक्टरांसाठी घर चलो अभियान उत्साहात संपन्न

Wed Jul 12 , 2023
– २०० हून अधिक डॉक्टर्स ला सेवापुस्तिका वाटप नागपूर :- भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरद्वारे सोमवारी लोकमत चौक, रामदासपेठ परिसरातील गणमान्य डॉक्टरांना भेटून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाकार्याच्या ९ वर्षपूर्तीनिमित्त केलेल्या विकास कामांसंबंधित घर चलो अभियान व सेवा समर्पण अभियानभाजपा नागपूरचे शहर अध्यक्ष आमदार प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात उत्साहात संपन्न झाले. याअभियानासाठी शहर महामंत्री राम अंबुलकर, संघटन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com