नागपूर :- शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल) नागपुर मध्ये गंधगीचा आलम असून एक्स-रे विभागा शेजारी असलेल्या स्त्री प्रतीक्षालयात स्त्री-पुरुषांचा वावर असून येथील स्वच्छालय ची तर अत्यंत दूराव्यस्था आहे. येथे घाणीचे साम्राज्य असून मागील अनेक महिन्यात किंवा वर्षापासून साफसफाई झाल्याचे दिसत नाही.
घाण करणाऱ्यावर मनपा दंड ठोकत असते. जर शासकीय रुग्णालया मध्येच घाण असेल तर त्याचा दंड कोणावर ठोठवावा. या संदर्भात अनेकदा तक्रारी करूणही स्वच्छता होत नसल्याचे दिसून येते. वार्डातही हीच स्थिती आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमी सांगितल्या जाते. मेडिकल चे चौकाकडील मुख्य प्रवेशद्वार कायमचे बंद करण्यात आले असून दुसऱ्या मुख्य साईट द्वारावर पाणी साचून असते. मात्र मेडिकल मध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी हाहाकार असतो. मेडिकल परिसरात असलेल्या सुलभ शौचालयात मुतारीचे सुद्धा पैसे घेत असल्याने अनेकांना उघड्यावर हे काम आटोपावे लागते. त्यामुळे सुलभ शौचालय परिसरातही घाणीचे साम्राज्य दिसून येते.
दीनदयाल थाली – मेडिकल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना अल्प किमतीत भोजन मिळावे म्हणून शासकीय मदतीतून 10 रु प्रमाणे दीनदयाल थाली सुरू करण्यात आली. आज दुपारी 2 वाजता दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्पाच्या दीनदयाल थाली केंद्राला भेट दिली असता जेवण संपल्याचे सांगून अनेकांना परत पाठविल्या गेले. यापूर्वी दिनदयाल थाली घोटाळा पुढे आला होता. नुकतेच संघप्रमुखांनी भरड अन्न थाली सुरू केली? गरिबांच्या नावावर चालणाऱ्या उपक्रमात थाली घोटाला होऊ नये एवढेच.
पेशंटला आणण्यासाठी किंवा मृताला नेण्यासाठी शासकीय ॲम्बुलन्सची वानवा असली तरी खाजगी ॲम्बुलन्सचा मात्र बोलबाला दिसून येतो. मेडिकल व्यवस्थापनाने स्वच्छता सहित अनेक बाबीवर लक्ष देऊन सुधारणा घडवून आणाव्या. अशी मागणी बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.