जिल्हास्तरीय लोकशाही दिन
नागपूर :- आज महिन्याचा पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे एक आगळेवेगळे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी स्वत: लोकशाही दिनात सहभागी तक्रारकर्त्यांचे गऱ्हाणी जाणून घेतल्या. त्यांचे निराकरण वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.
पोलीस विभागाने संबंधित प्रकरणाचा तपास करुन तत्काळ निकाली काढावे व गुन्हा दाखल करावा. महसूल विभागांनी प्रकरणे 15 दिवसात निकाली काढावे तर सह जिल्हा निबंधक यांनी या बाबत बैठकीचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. सर्व प्रकरणांचा वेळेत निराकरण करणे गरजेचे असून तक्रारकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे हाच या लोकशाही दिनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाही दिनात एकूण अकरा निवेदन दाखल केली होती. यामध्ये सर्वात जास्त म्हाडाचे सहा अर्ज होते, तर महसूल विभाग-3, पोलीस-1 व सह जिल्हा निबंधक (नागपूर शहर)-1 यांचा समावेश होता. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा शल्यचिकित्सक माधुरी थोरात तसेच पोलीस अधिकारी व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.