थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसराची दुरावस्था

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 5 :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुने प्रभाग क्र 3 मध्ये नागपूर जबलपूर महामार्गाच्या कडेला नागसेन नगर परिसरात शैक्षणिक क्रांतीचे जनक थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा एकमेव पुतळा मागील कित्येक वर्षापूर्वी उभारला असून या पुतळ्याशी नागरिकांच्या भावना जुडलेल्या आहेत.मात्र या पुतळ्यापरिसरा लगत असलेल्या नाली बांधकाम अर्धवट असून कामे रखडलेले आहेत तसेच मागील काही महिन्यापासून या अर्धवट नालीच्या बांधकामाला संबंधित कंत्राटदार इच्छुक दिसत नसल्याने या पुतळा परिसराची दुरावस्था झाल्याने अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत .तेव्हा या भावनेचा उद्रेक न व्हावा यासाठी नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन संबंधित कंत्राट दाराकडून हे अर्धवट नाली बांधकाम पूर्णत्वास आणून पुतळा परिसराची दुरावस्था दूर करावी यासाठी माजी नगरसेविका रमा नागसेन गजभिये यांनी मुख्याधिकारी ला सलग दोनदा निवेदित करण्यात आले मात्र मुख्याधिकाऱ्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवून अक्षम्य दुर्लक्ष केले ज्यामुळे प्रशासनाकडूनच पुतळा परिसराची दुरावस्था होत असेल तर दाद मागायची कुणाला? अशी विचारणा नागसेन नगर च्या नागरिक तसेच अनुयायांच्या वतीने माजी नगरसेविका रमाताई नागसेन गजभिये करीत असून भावनेचा उद्रेक झाल्यास नगर परिषद वर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका रमाताई नागसेन गजभिये यांनी दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पहिल्याच पावसात घरात व बाजारातील दुकानात शिरले पाणी; पालिकेविरोधात व्यापाऱ्यांचा रोष

Wed Jul 6 , 2022
अमरदिप बडगे , प्रतिनिधी तिरोडा – अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला पाऊस  शहरात जाेरदार बरसरला. मात्र या पावसाने पालिकेसह स्मार्टसिटीच्या वतीने केलेेले निकृष्ट कामाचे पितळ उघडे पाडले. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील संत रविदास वार्ड चंद्रभागा नाका  भागात सोमवारी दि.04 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचराच हाेत नसल्याने या परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांना साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com