नागपूर :- कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) मंगळवारी (ता.02) नागपूर शहरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यात आला.मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात पार पडलेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सचिव वै्द्यकिय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. निलीमा वानखेडे, सहयोगी प्राध्यापक इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या प्रतिनिधी डॉ. शितल मोहने उपस्थित होते.
बैठकीमध्ये समितीपुढे कोव्हीडमुळे मृत पावलेल्या एकूण 2 रुग्णांची माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता 1 रुग्ण चंद्रपूर व दुसरा गडचिरोली जिल्हयातील होता. यापैकी दोन्हीही रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे प्रमाणित करण्यात आले. 1 एप्रिल 2023 पासुन 3 मृत्यु विश्लेषन बैठकी झाल्या. यामध्ये एकूण 15 संशयीत कोव्हीड रुग्णांच्या मृत्युचे विश्लेषण करण्यात आले त्यापैकी 9 मृत्यु कोव्हीडमुळे झाल्याचे घोषीत करण्यात आले आहेत. व यामध्ये 60 वर्षावरील रुग्णांची संख्या 6 इतकी होती.
स्व. प्रभाकर दटके, महाल रोगनिदान केंद्रावर 60 वर्षावरील बुस्टर डोज करीता इन्कोव्हक लस उपलब्ध महाल रोगनिदान केद्रांवर नाकावाटे दिल्या जाणा-या इन्कोव्हक लससाठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. सध्या राज्यात कोव्हीड 19 आजाराचा रुग्णांची संख्या व झालेल्या मृत्युचे विश्लेष्ण केले असता कोव्हीड 19 मृत्युचे प्रमाण हे 60 वर्षावरील नागरीकामध्ये जास्त असल्याचे दिसुन येते. यास्तव इन्कोव्हक (Incovacc ) लस फक्त 60 वर्षावरील नागरीकांच्या प्रिकॉशन दोस करीता वापरण्यात येणार आहे.
मृत्यू विश्लेषण समितीद्वारे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संदर्भात काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत.
(1) सर्व आरोग्य संस्था यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहव्याधी असणारे व्यक्ती व जेष्ठ नागरीक यांची फल्यु सदृष्य लक्षणे आढळताच कोविड-19 प्रयोगशाळा चाचणी करुन योग्य ते उपचार सुरु करावे व आरोग्य स्थीतीवर लक्ष देऊन आवश्यकतेनुसार रुग्णालयात भर्ती करावे.
(2) ILR व सारी रुग्णाबाबत क्षेत्रीय सर्वेक्षण सक्षम करावे.
3) सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात संक्रमण नियंत्रण समिती कार्यरत असावी व या समिती व्दारे नियमित निरिक्ष्ण करावे तसेच ज्या वार्डात, जेष्ठ नागरिक, सहव्याधी व रोग प्रतिकारक शक्ति कमी असलेले रूग्णावर उपचार सुरू आहे अश्या रूग्णाबाबतीत कोविड संसंर्ग प्रतिबंध नियमावली चे काटेकोर पालन होईल याची खात्री करावी तसेच या रूग्णाची कोविड-19 चाचणी करावी.
(4) श्वसनसंस्था संबधीत आजार जसे दमा, क्षयरोग व इतर असलेल्या रूग्णाणी त्याचे नियमीत उपचारात खंड करू नये व कोविड प्रतिबंध नियमावली चे पालन करावे तसेच कोविड सदृष्य लक्षणे आढळतात त्वरीत कोविड-19 चाचणी करावीण् या उपाययोजनांमुळे कोव्हिडमुळे होणा-या मृत्यूदरात निश्चित घट होईल, आदी शिफारशी समितीद्वारे करण्यात आलेल्या आहे.
कोरोनापासून होणारा धोका टाळण्यासाठी ही काळजी घ्या
– हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
– सॅनिटायजरने हात निर्जंतूक करा
– गर्दीमध्ये जाणे टाळा
– गर्दीत जाण्याची गरज पडल्यास मास्क लावूनच घराबाहेर पडा
– खोकताना व शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा
– वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू, जागांना निर्जंतूक करा
– पौष्टिक आहार घ्या
हे टाळा
– हस्तांदोलन अथवा आलिंगन
– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
– मास्क न वापरता गर्दीत जाणे
– कोव्हिड सदृष्य लक्षणांकडे दुर्लक्ष करणे