– रस्ता दुतर्फा शेती असणारे शेतकरी अत्यंत त्रस्त
– संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे वारंवार ग्रामपंचायत ठराव व निवेदन देऊनही दुर्लक्ष
कोदामेंढी :- अरोली -कोदामेंढी जि प व पं. स कोदामेंढी गणा अंतर्गत इंदोरा – वाकेश्वर या दोन किलोमीटर पीडब्ल्यूडी रस्त्याची हालत पांदण रस्त्या पेक्षाही खस्ता झाल्याने या रस्त्यावर, दुचाकी चालवणारे अपघाताने जखमी होत आहे तर धड पायदळही चालता येत नसून मागील पाच वर्षांपूर्वी पासून संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी वारंवार निवेदन देऊ नये दुर्लक्ष होत असल्याने रस्ता दुथर्फा शेती असणारे व या रस्त्यावरून आवा गमन करणारे नागरिक कमालीचे त्रस्त असून, येथे शेतकऱ्यांना त्यांचे शेतीचे काम करण्यासाठी मजूर आणताना मजुरांना नियमित मजुरी पेक्षा शंभर ते दोनशे रुपये जास्त रक्कम देऊन आणावे लागत आहे कारण रस्ता पाहून मजूरही येथे येण्यास नकार देत असून नुकतेच पुन्हा निवडून आलेले मौदा- कामठी विधानसभेचे आमदार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष देऊन या रस्त्याचे मजबुतीकरण करावे अशी मागणी या रस्ता दुतर्फा असणारे वाकेश्वर येथील शेतकरी वय रस्त्यावरून आवागमन करणारे नागरिक माजी सरपंच उपासराव महागुन नेवारे, टीकाराम सपाटे, दिनेश नेवारे, हिरालाल सेंगर ,अजय सेंगर, जितेश सिसोदिया, उमेश चवळे ,चंद्रप्रकाश तिवारी ,विकी घेऊतोंडे, योगेश घेऊतोंडे, अर्जू घेऊतोंडे, रामू नेवारे ,वच्छला नेवारे, सीता नेवारे, संतोष सेंगर, दिलीप सेंगर , नरेश सेंगर, संतोष सेंगर सह वाकेश्वर व इंदोरा येथील त्रस्त शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.