गडचिरोली :- विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे ग्रामीण क्षेत्रासाठी सबंधित ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेवुन घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास यादीसह प्रस्ताव सादर करावे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्याना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे. या उदद्देशाने राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच धनगर समाज भटक्या जमाती-क प्रवर्गाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागात किमान 10 कुटुंबासाठी सामुहिक वसाहन योजना राबवून अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यासाठी सक्षम अधिका-याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु 1.20 लाखपेक्षा कमी असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे 100 रु स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लाभार्थी कुटुबाचे स्वत चे मालकीचे घर भुखंड असल्याचा पुरावा, नमुना 8 किवा 7-12 उतारा दस्त नोंदणीची प्रत, घराचे सद्यास्थितीचे छायाचित्र ग्रामसभेचा ठराव अर्जदाराचे आधार ओळखपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, जॉब कार्ड, घरकर पावती आदी कागपत्रासह अर्ज संबंधित ग्रामपंचायती मध्ये सादर करावे अधिक माहिती करीता 07132-222192 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे