आयुक्तांनी केली संत्रा मार्केट परिसराची पाहणी

– नियमित स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश

नागपूर :- नागपूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.२६) सकाळी संत्रा मार्केट परिसराची पाहणी केली. या परिसरात रात्रीच्या वेळी देखील स्वच्छता करण्याबाबत त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला निर्देश दिले.

मनपा आयुक्तांनी कचरा ट्रान्सफर स्टेशनवर सुद्धा स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी घनकचरा व्यस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, गांधीबाग महाल झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड उपस्थित होते.

आयुक्तांनी बाजारपेठेत पसरलेल्या घाणीबाबत नाराजी व्यक्त केली आणि नियमित स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश दिले. बाजारपेठेतील कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये घेऊन जाण्याकरिता कचरा संकलीत करून ट्रान्सफर स्टेशनवर आणला जातो. या ट्रान्सफर स्टेशनचे देखील आयुक्तांनी निरीक्षण केले. ट्रान्सफर स्टेशनवर मोठ्या प्रमाणात कचरा विखुरलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी बाजारपेठेत रात्रकालीन स्वच्छता करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले. त्यांनी बाजारपेठेत नियुक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची माहिती प्राप्त करून घेतली.

यावेळी गांधीबाग झोनचे स्वच्छता अधिकारी सुरेश खरे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नेरी च्या ऍड. दादासाहेब कुंभारे विद्यालयात रक्षाबंधन साजरा

Mon Aug 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन 22 ऑगस्ट ला ऍडव्होकेट दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला सोबतच वृक्षाला सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राखी बांधण्यात आली. या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अफजल मेहंदी यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना राखीची भेट म्हणून शालेय बॅगचे वितरण केले व मिठाईचे वाटप केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com