जय श्रीराम, जय जय श्रीराम च्या जयघोषाने कन्हान शहर दुमदुमले

– भव्य पालखी शोभायात्रा काढुन श्रीराम नवमी महोत्सव उत्साहाने साजरा

कन्हान :- सकल हिंदू समाज कन्हान शहर च्या व्दारे भव्य पालखी शोभायात्रा काढुन जय श्रीराम, जय जय श्रीरामच्या जयघोषाने संपुर्ण कन्हान परिसर दुमदुमले , श्रीराम नवमी महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला असुन भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

रविवार (दि.६) एप्रिल ला श्रीराम नवमी निमित्त सकल हिंदू समाज कन्हान शहर द्वारे शिव पंचायत हनुमान मंदिर गांधी चौक कन्हान येथे प्रभु श्रीरामाची विधिवत पूजा अर्चना करुन, भजन, कीर्तन, हवन पूजा , हनुमान चालीसा पाठन, आरती करण्यात आली. सायंकाळी शिव पंचायत हनुमान मंदिर येथे श्रीरामाची आरती करुन भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत शिवशंभु आखाडा संताजी नगर कांद्री च्या तरुण मुला, मुलीनी आपल्या कलेचे प्रदर्शन करुन राम भक्तांचे मन मोहित केले. शोभायात्रा महामार्गने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, तारसा चौक, सात नंबर नाका, शितला माता मंदिर येथे पोहचली असता वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, संजय चौकसे, दिलीप मरघडे, गोकुल पटेल, अशोक खैरकर, प्रकाश ढोके, वसंता राउत, प्रेमचंद चव्हाण, चंदु ठाकरे सह भाविकांनी फुलाचा वर्षाव, शरबत वितरण करुन पालखीचे स्वागत केले. धर्मराज शाळेपासुन परत पेट्रोल पंप, तारसा चौक, गहुहिवरा चौकातुन पांधन मार्गाने गणेश मंदिर कन्हान येथे पोहचुन शोभायात्रेचे समापन करण्यात आले.

गणेश मंदिरात भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. गणेश मंदिर पंच कमेटी च्या वतीने महाप्रसाद वितरण करुन श्रीराम नवमी महोत्स व उत्साहाने साजरा करण्यात आला. शोभायात्रा दर म्यान कुठलीही अनुचित घटना घडु नये म्हणुन कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा नेतृत्वात पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी ज्ञानेश्वर दारोडे, शक्ती ट्रांसपोर्ट मालक छोटु भैया, लोकेश दमाहे, अतुल हजारे, राजेश पोटभरे, जीवन मुंगले, शिवाजी चकोले, शुभम यादव, सौरभ यादव, देवेंद्र बावनकर, वेदांत भनारकर, बादल विश्वकर्मा, अमन यादव, उदय माहुरे, शुभम चरडे, विनोद यादव, नरेश बावणे, वंश गोकुल पटेल, नरेंद्र ठवरे सह महिला आणि पुरूष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेच्या यशस्वितेकरिता आयोज क सकल हिंदू समाज कन्हान शहर अध्यक्ष शुभम बावनकर, ऋषभ बावनकर, हितेश राजपुत, हिमांशु सावरकर, हर्षल सावरकर, सार्थक पोटभरे, आयुष संतापे, रेहान लोंढे, जीवन नांदुरकर, सुजल यादव, ओम यादव, शिव यादव, सौरभ गावंडे, वेदांत राऊत, सुधीर लोंढे आदि भक्तांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भक्तों में चना, पोहा वितरित

Tue Apr 8 , 2025
– नागपुर बारदाना मर्चेंट एसोसिएशन ने किया शोभायात्रा का स्वागत नागपुर :- नागपुर बारदाना मर्चेंट एसोसिएशन की ओर से रामनवमी पर मधुकर वैध के कार्यालय नेहरू पुतला के पास किशोर राठौड़ की अध्यक्षता में आलू पोहा,चना, शीतल पेय का वितरण किया गया। इस अवसर पर नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्स के सचिव सचिन पुनियानी, जवाहर चुग, गुलशन राहिजा, मधुसूदन सारडा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!