मुख्यमंत्री सचिवालयात साकारतेय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ महारांगोळी

–  १२ X२४ फुट आकार आणि ६० किलो रांगोळी पासून निर्मिती

नागपूर :- राज्य शासनाची महत्वाकांक्षी महिला सक्षमीकरणाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत महारांगोळी येथील सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारली जात आहे. विधान भवनाच्या पोर्चमध्येही याचीच एक प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची शिबिर कार्यालये उभारण्यात आली आहेत. याच परिसरात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागील भागात १२ सेमी उंचीच्या डायसवर १२ X२४ फुट आकाराची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर आधारीत रांगोळी साकारण्यात येत आहे. लाडक्या बहीणीची प्रातिनिधिक प्रतिकृती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रतिकृती रेखाटण्यात येत असून खास शैलीतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही खास शब्द रचनाही रेखाटण्यात येत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी उपअभियंते आणि गेल्या ४५ वर्षांपासून रांगोळी कलाकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सुनिल तरारे यांच्या नेतृत्वात नागपूर व यवतमाळ येथील एकूण पाच कलाकार ही महारांगोळी साकारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सलग 13 तास हे कलाकार या रांगोळीचे आरेखन आणि रंगसंगतीचे कार्य करीत आहेत. १५ डिसेंबर पर्यंत ही रांगोळी तयार होणार आहे. याठिकाणी कार्यालयीन व परिसर स्वच्छतेत मग्न असणाऱ्या महिला कामगार कामातील उसंत मिळताच या रांगोळीची अवलोकन करुन कौतुक व सेल्फी घेत असल्याचे उत्साही चित्र दिसून येत आहे. या रांगोळीची अवलोकन व सेल्फी काढणे सोयीचे व्हावे यासाठी रांगोळी शेजारी दीड फुट उंचिचा डायस उभारण्यात आला आहे.

विधानभवनाच्या मुख्य पोर्च मध्येही हाच कालाकारांचा चमू ४ X ६ फुट आकारातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत रांगोळी साकारणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मध्य रेल में यूनियन मान्यता चुनाव 2024 में एनआरएमयू एक आश्चर्यजनक विजेता के रूप में उभरा

Sat Dec 14 , 2024
– कॉमरेड वेणु पी नायर जीएस/एनआरएमयू (सीआर/केआर) ने सभी रेल कर्मचारियों को उनकी उत्साहपूर्ण भागीदारी के लिए हार्दिक आभार और धन्यवाद व्यक्त किया – नेशनल रेल्वे मज़दूर यूनियन (एनआरएमयू) को हाल ही में 4, 5 और 6 दिसंबर 2024 को आयोजित यूनियन मान्यता चुनावों में मध्य रेल पर अपनी चुनौतीपूर्ण जीत की घोषणा करते हुए गर्व हो रहा है। नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!