वाशीम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता जगदंबा देवी मंदिर, संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पोहरादेवी, नगारा भवन येथे संत सेवालाल महाराज यांचा २१ फुट उंच पंचधातुचा भारतातील एकमेव अश्वारूढ पुतळा आणि १३५ फुट उंच धवल रंगातील सेवाध्वजाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ॲड. निलय नाईक, बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज, महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 326 कोटी 24 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com