नागपूर :- नागपूरच्या दीक्षाभूमीवर असलेल्या बोधीवृक्षाला आज 55 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हा बोधीवृक्ष श्रीलंकेच्या अनुराधापूर येथे असलेल्या बोधिवृक्षाची मूळ शाखा आहे. अनुराधापूर येथील बोधीवृक्ष सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र यांच्या माध्यमातून बुद्धगया येथिल महाबोधी महाविहाराच्या परिसरात ज्या वृक्षाखाली तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली त्याच बोधी वृक्षाची मुळ ब्रांच अनुराधापूरला पाठवण्यात आली होती. त्याच बोधिवृक्षाची ही शाखा आहे.
डॉ भदंत आनंद कौशल्यायन यांच्या माध्यमातून भारतातील दीक्षाभूमीवर त्याचीच शाखा आणल्या गेली. व 12 मे 1968 ला त्या बोधीवृक्षाचे विधिवत रोपण करण्यात आले. आज त्याला 55 वर्षे पूर्ण झालेली आहेत.
जगात बोधिवृक्षाला अनन्य साधारण महत्व असून त्याला बुद्धाचे प्रतिरूप समजले जाते. बोधिवृक्ष हा 24 तास ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे म्हणून तो वंदनीय व पूजनीय सुद्धा आहे. त्यामुळेच आज बसपा नेते व पाली चे अभ्यासक उत्तम शेवडे यांनी दीक्षाभूमीवर जाऊन त्या बोधिवृक्षाला वंदन केले. त्यांचे सोबत कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे नेते व पालीचे अभ्यासक शामराव हाडके प्रामुख्याने उपस्थित होते.