संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिन कार्यक्रम समिती आणि इतिहास विभागाच्या वतीने चैत्र शुक्ल अशोकाष्टमीला महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी महान सम्राट अशोकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून केली. कार्यक्रम समन्वयक आणि इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना, अखंड भारताचे निर्माते सम्राट अशोक यांच्या कल्याणकारी, धर्मनिरपेक्ष राज्य आणि वैश्विक धर्माच्या प्रासंगिकतेवर म्हणजेच निष्ठा, आदर, नैतिकता आणि समानतेच्या तत्वावर भर दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी सम्राट अशोकाच्या धर्मविजय धोरणावर आणि लोककल्याणकारी कार्यांवर प्रकाश टाकतांना विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्चीन्हावर मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ.जयंत रामटेके, डॉ.इफ्तेखार हुसैन, डॉ.सिद्धार्थ मेश्राम, डॉ.अझहर अबरार, डॉ.तुषार चौधरी, नोडल अधिकारी डॉ.प्रशांत ढोंगळे, प्रा. धम्मदीना बोरकर, रजिस्ट्रार स्वप्नील राठोड व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनस्वी बोरकर, सूत्रसंचालन मितेश चहांदे तर आभार सौरभ रहाटे यांनी मानले.