सत्ताधाऱ्यांचे लक्ष इव्हेंटबाजीकडे, माता भगिनी सुरक्षा मात्र वाऱ्यावर……

नागपूर :- राज्यातील लाडक्या लेकींच्या सुरक्षेकडे इव्हेंटबाज महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी च्यावतीने रामटेक मधील गांधी चौकात तोंडाला काळ्या फिती लावून आणि हातात काळे झेंडे घेऊन मूक आंदोलन करण्यात आले.

जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कानात या मूक आंदोलनाचा आवाज घुमल्याशिवाय राहणार नाही. सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या या सरकारला महाराष्ट्रातील जनताच आता जागे करणार आहे.

शनिवारी २४ ऑगष्ट रोजी रामटेक येथील गांधी चौक येथे झालेल्या मुक निषेध मोर्चा प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे, पारशिवनी तालुका प्रमुख कैलास खंडार, राष्ट्रवादी (शरद पवार) पार्टीचे रामटेक तालुका प्रमुख नकुल बरबटे, युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, कामगार सेना तालुका प्रमुख समीर मेश्राम, महिला रामटेक तालुका प्रमुख कलावती तिवारी, रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर, उपशहर प्रमुख सचिन देशमुख, राहुल टोंगसे, मौदा तालुका संपर्क प्रमुख नरेश भोंदे, युवासेना तालुका प्रमुख निकुंज गराडे, शुभम डुकरीमारे व सर्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख व शिवसैनिक याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शालिनीताई मेघे हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर दीर्घकालिक मानसिक स्वास्थ्य मरीजों को नई उम्मीद देता है

Sun Aug 25 , 2024
– शालिनीताई मेघे हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर में व्यापक किफायती मानसिक स्वास्थ्य पुनर्वास सुविधाएं उपलब्ध हैं नागपूर :- 895 बेड्स वाले मल्टी सुपर स्पेशियलिटी शालिनीताई मेघे हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरने कम से कम लागत पर व्यापक स्वास्थ्य सेवा उपलब्ध कराने के लिए एक अलग प्रतिष्ठा बनाई है। हॉस्पिटल सभी व्यापक स्पेशियलिटी उपचार के लिए निःशुल्क ओपीडी परामर्श सुविधा उपलब्ध करता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!