संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी:- प्रभाग 15 तील आनंद नगर, रामगढ़,रमानगर, शिवनगर, विक्तुबाबा नगर, सैलाब नगर, सुदर्शन नगर आणि गौतम नगर येथे काल मध्य रात्री दरम्यान झालेल्या अतिवृष्टि मुळे रहिवाश्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्य भिजून गेले आहे.या भागात मोल मजूरी करून राहणाऱ्या ची संख्या जास्त असून पावसा मुळे रोजगार सुद्धा हिरावला आहे.आज गुरुवारी सकाळी 10 वाजता भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ नायब तहसीलदार अमर हांडा याना निवेदन देऊन नुकसान भरपाई हेतु पंचनामा करण्याची मागणी केली.
शिष्टमंडळात माजी नगरसेवक लालसिंग यादव आणि विक्की बोंबले,शंकर चवरे,दिनेश खेडकर, विरेंद्र राऊत, अरविंद चवडे, अब्दुल गणी, सुबोध चांदोरकर यांचा समावेश होता.निवेदनाची प्रत माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले, उपविभागीय अधिकारी व नगर परिषद चे प्रशासक संजय पवार, मुख्यधिकारी संदीप बोरकर यांना सुद्धा देण्यात आल्या.