नागपुर :- मागिल वर्ष भरापासून श्रद्धानंद पेठला दोन मोठीं बिल्डिंग ची कामे चालू आहे तेथील बेसमेंटचे माती मिश्रीत पाणी Storm water drainage system नाली मध्ये सोडल्याने माझे घरा समोर संपुर्ण नाली ही मातीने चोक होऊन कडक झाली आहे…त्यातून पाणी जात नाही वाहत नाही ते संपूर्ण पाणी रोडवर व माझे गेट समोर साचून राहते त्यावरून घसरायची भीती वाटते. अशा प्रकारे संबंधित यंत्रणा बेजबाबदार पणे वागून शासकीय मालमत्ता, रहीवासी यांना धोका पोहोचवते या साठी National Green Tribunal कडे पण दाद मागायचा विचार सुरू आहे.
धरमपेठ झोनचे असिस्टंट कमिशनर व-हाडे यांना ५-६ वेळा फोन वर कंप्लेंट करून सुद्धा काहीच कारवाई केली नाही आणि मागिल चार दिवसांपासून मेन रोड अभ्यंकर नगर Two Joe’s च्या बाजूला ( स्व. काणे यांचें घर ) प्लाॅट नं. ८० येथे मनपा ठेकेदार मोहन गुरुबक्षानी यांचें काम सुरू आहे यांनी पण बेसमेंट चे माती मिश्रीत पाणी सोडायला सुरुवात केली आहे त्यामुळे पाणीपुरी वाल्या चौकात चिखल साचला आहे.
दुर्दैवाने या भागातील कोणीही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांत लक्ष घालत नाही.
पण माझा लढा मी सुरू ठेवणार संपूर्ण शहरातील Storm water drainage system अशा प्रकारे चोक झाली आहे म्हणून पावसाळ्यात पाणी रोडवर येतं. – प्रशांत ठाकरे