प्रशासनाला पडला गुटखाबंदीचा विसर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- राज्य शासनाने गुटखा व सुगंधित सुपारीवर बंदी घातली असली तरी कामठी तालुक्यात गुटख्याच्या विक्रीतून दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे .यावर प्रतिबंध घालण्याकडे संबंधित प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे प्रशासनाला गुटखा बंदीचा विसर पडल्याचे चित्र समोर आले आहे.

कामठी तालुक्यात खुलेआम मादक पदार्थाची विक्री होत असून ठिकठिकाणच्या पानटपरिवर सहजतेने गुटखा, मावा, तंबाकू सहजपणे मिळत आहे.

कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात एक हजार च्या आत पान टपऱ्या व किराणा दुकान आहेत या टपऱ्यावर बंदी असलेला गुटखा सर्रास विकला जातो यातून गल्लीबोळातील छोट्या मोठ्या दुकानांनाही अपवाद नसुन तेथे गुटखा सहज उपलब्ध होत आहे.परराज्यातुन छुप्या मार्गाने येणारा गुटखा हा ठिकठिकानी मिळत आहे.पांनटपरी व किराणा दुकांनापर्यंत या मालाचा होलसेल पुरवठा केला जात आहे.विशेष म्हणजे दुचाकीवरून द्वारपोच केला जातो यातून मोठे अर्थकारण निर्माण झाले आहे.संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैध गुटखा विक्री तात्काळ बंद करावी अशी नागरिकांची मागणी असली तरी या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.

गुटख्याची विक्री करताना दिवसाढवळ्या पांनटपरी व किराणा दुकानापर्यंत दुचाकीवरून वाहतुक होते .अन्न व भेसळ विभागाचे दुर्लक्षच गुटखा माफियांच्या पथ्यावर पडत आहे. खुलेआम गुरखा विक्री होत असताना संबंधित विभाग मूग गिळून गप्प कसा ?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे तर यामुळे कायद्याची अंमलबजावणी फक्त कागदावरच केली जात आहे काय?असा प्रश्न सुदधा येथील सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांचे महात्मा फुले यांना अभिवादन

Tue Apr 11 , 2023
नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमीत्त राजधानी नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुतळयाला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com