संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– येरखेडा ग्रामपंचायत ला नगर पंचायत चा दर्जा मिळवून देण्यासाठी 28 दिवसापासून पुकारले होते ‘आरसा दाखवा आंदोलन’
कामठी :- नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या येरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत लोकसंख्या ही अंदाजे30 ते 35 हजाराच्या घरात असून सन 2011 च्या जनगणनेनुसार 15 हजार 727 इतकी लोकसंख्या आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे येरखेड्यात विविध मूलभूत समस्यांचा डोंगर साचला आहे.तसेच ग्रा प च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विकासकामे खोळंबली आहेत.परिणामी ग्रा प प्रशासन निष्क्रिय ठरत आहे.तेव्हा गावाचा विकास हाच एक ध्यास मनात धेरून विकासात्मक दृष्टिकोनातुन येरखेडा ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा मिळणे आवश्यक आहे मात्र सत्तेच्या लालसेपोटी येरखेडा ग्रा प प्रशासन नगरपंचायत प्रस्तावाला मंजुरी देत नसल्याने येरखेडा ग्रामस्थ संघर्ष समितीने येरखेडा ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा मिळवून देण्यासाठी 21 ऑगस्ट पासून येरखेडा नवीन ग्रा प कार्यालय समोर मागणी पूर्ण होईपर्यंत आरसा दाखवा आंदोलन सह बेमुद्दत साखळी उपोषण पूकारले होते.या उपोषण मंडपाला आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी काल 17 सप्टेंबर ला भेट देत यासंदर्भात नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून येरखेडा नगर पंचायत होण्यासाठी नगर विकास विभागाला प्रस्ताव पाठविला आहे त्यानुसार येत्या आठवड्यात येरखेडा ग्रा प ला नगर पंचायत चा दर्जा मिळणार असल्याचे मौखिक आश्वासन दिले. या आश्वासनाचा मान राखत आमदार बावनकुळे व टेकचंद सावरकर यांच्या हस्ते पाणी प्राशन करून उपोषण कर्त्यानी तब्बल 28 व्या दिवशी साखळी उपोषणाची सांगता केली.
येरखेडा ग्रा प नगर पंचायत झाल्यास येरखेडा गावाचा सर्वांगीण विकास होत ले आउट नियमानुकुल करण्यात येईल .तेव्हा गावाचा विकास होणे व नागरिकाना सोयी सुविधा पुरविण्यासाठी आपसी राजकीय मतभेद बाजूला सारून ग्रा प प्रशासनाने ग्रामसभा घेऊन नगर पंचायत प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अन्यथा येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी ने दिलेल्या प्रस्तावाच्या आधारावर मुख्यमंत्री कडून नगर पंचायत चा दर्जा मिळवण्यात येणार आहे. असे मौलिक मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.
या साखळी उपोषणात आशिष वंजारी, देवेंद्र गवते, राजकिरण बर्वे, गजानन तिरपुडे, मनीष कारेमोरे, राजेंद्र चावरे, सुदाम राखडे, सतीश डहाट, सुषमा राखडे, मंगला कारेमोरे, आचल तिरपुडे, शीतल चौधरी, सरिता भोयर, जया वाडीभस्मे, ईश्वरचंद चौधरी, राकेश काळे, मुनमुन यादव, कुलदीप पाटील, नरेश मोहबे, शीला बंडीवार, राजश्री घिवले, सुनीता आगाशे, रेखा मराठे,शालिनी भस्मे, विनायक पाटील, संदीप पोहेकर, भूषण पाटील, ज्ञानशाम गुज्जेवार, अबरार खान, अंकित येरगुटलेवार, पुरुषोत्तम पोटभरे, रोशन हमरे, रोशन देशमुख, राहुल शर्मा, योगेश माथुरे, शैलेश भोयर, राजेंद्र बैस, हरीश भुरे हर्षल पोटभरे, रवी तलमले, अश्विन शेरके,राहुल लाडस्कर, रजत राऊत,संकेत मोर, महेश माथुरे, महेंद्र बारमाटे, शुभम वाडीभस्मे, विशाल वाटकर, शुभम चौधरी, प्रकाश पाहुणे, आसिफ पठाण,दयानाद पिले, राकेश खरोले, अरुण कुसवाह, कुणाल गड्डमवार, सोनू सुर्यवंशी,अंकित वाघ, आतिश माने, मनीष भाटी, विलास पाटील, बादल भस्मे, राजेंद्र श्रावणकर, आशिष भोयर, कुबेर महल्ले,राजेश पिपरेवार, तुषार धाबळे, आयुष देवके, आदित्य वर्मा, कृष्ण इतावे, स्वप्नील शिवणकर, प्रवीण आगाशे, रामकृष्ण बोधरे,वेदांत वंजारी, जॉनी भस्मे, मोहम्मद नसरुद्दीन, परेश पोहेकर, राहुल वाडीभस्मे,गडे काका आदी उपस्थित होते.