सर्वांनी मतदानातुन दिलेल्या आशीर्वादामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला खासदार होता आले – खासदार श्यामकुमार बर्वे 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- ग्रामपंचायत च्या माजी उपसरपंच असलेल्या सर्वसाधारण तळागाळातील व्यक्तीला आपल्या सर्वांनी मतदानातुन दिलेल्या आशिर्वादामुळे खासदार होता आले. महाविकास आघाडी च्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदारांनी उन्हाची कुठलीही तमा न बाळगता माझ्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले या विजयाचे श्रेय आपले आहे.आपण केलेल्या परिश्रमाची उतराई करण्यासाठी रामटेक मतदार संघाचा पूर्णता विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे मौलिक मत खासदार श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे यांनी यांच्या निवासस्थानी शिवसेना च्या वतींने आयोजित खासदार सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.

शिवसेना नागपुर जिला ग्रामीण तालुका कामठी शहर द्वारा नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने माजी जी प अध्यक्ष रश्मी बर्वे, शिवसेना जिला प्रमुख देवेंद्र गोडबोले, जिला उप प्रमुख दिलीप मुडे, कामठी शहर प्रमुख मुकेश यादव, श्रीराम हटवार ,रवि निकाळजे, सुनील काटगाये, रितेश केजरकर ,रितेश पाटील, बंटी खरकटे,, सूरज दास, बापू बरई मनोज पाटिल, दिलीप बावनकुड़े आदी शिव सैनिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेमार्फत श्री साई मंदिर समितीला वॉटर कुलर व फिल्टर भेट

Thu Jun 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- विविध आजारावर नियंत्रन मिळण्यासाठी आणि निरंतर निरोगी तसेच सदृढ राहण्यासाठी योग अभ्यास आणि नियमित योगसाधना आवश्यक आहे असे मत नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज गुरुवारी कामठी-कन्हान मार्गावरील श्री साई मंदिरात सदाशिवराव पाटील शिक्षण संस्थेमार्फत श्री साई मंदिर समितीला वॉटर कूलर व फिल्टर भेट स्वरूप आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसांगी साई मंदिराचे पुजारी देवनाथ बाबा,माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com