थानेदार विलास काळे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

संदीप कांबळे,कामठी

गरेज मालक आंनद नायडु ची पत्रपरिषद घेऊन न्यायायी मागणी.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंद्याचा बोलबाला असुन आरोपी पकडण्यास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर (ग्रा) ला सहकार्य करण्या-या गॅरेज चालकास पोलीस स्टेशन ला रात्री बोलावुन थाने दाराने मारहाण केल्याने पोलीस स्टेशन चा संतप्त नाग रिकांनी घेराव करून कन्हान थानेदारांच्या हेतुपुरसपर मारहाण केल्याचा आरोप करून गॅरेज चालक आंनंद नायडु यांच्यावर झालेल्या अन्याया विरूध्द कन्हान थानेदार विलास काळे यांचेवर गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली आहे.
कन्हान औद्योगिक शहर म्हणुन ओळखले जात कन्हान मध्ये औद्योगिक संस्था हळूहळू बंद होत अस ताना कन्हान पोलीस स्टेशनला “रक्षकच भक्षक” ची भुमिका थानेदार विलास काळे करित वरिष्ठाच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात असुन कोळसा, रेती, लोंखंड, डिझेल, घरफोडी, चो-या वाढुन नियमाना धाब्यावर टागुन सट्टा, जुआ, अवैद्य दारू, नसिले पदार्थ विक्री बिनधास्त असल्याने असामाजिक तत्वाला ऊत येऊन सर्व सामान्य नागरिकांना जगणे कठीण हो़त आहे. गुन्हेगारास पाठीला व फिर्यादीस वेठीस धरल्या जात असल्याने परिसरात शांती सुव्य वस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी कन्हान कांद्री सीमेवर असलेल्या दिल्ली बिअरबार मध्ये मारपीट व दरोडाचे फरार आरोपी पकडण्यास गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण ला मदत केल्याने गॅरेज चालक आनंद नायडू आणि आंनद डिझेल रिपेअरिंगचे ऑपरेटर सचिन यादव यास सोमवार (दि.२५) एप्रिल ला कन्हान थानेदारांनी पोलीस स्टेशन ला आपल्या चेंबरमध्ये रात्री १०.३० वाजता बोलावुन शिवीगाळ करून तुझा बाप कोण आहे ? म्हणुन बेधम मारहाण केल्याने स्थानिक नागरिकांनी कन्हान पोलीस स्टेशन चा घेराव करित थानेदार विरूध्द संताप व्यक्त करित फिर्यादीची वैद्यकीय तपासणी करिता नेले असता प्रा थमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या डॉक्टरानी नागपूर च्या शासकीय रुग्णालयात पाठविल्याने तेथील वैद्य कीय तपासणीत मारहाणीच्या घटनेला दुजोरा मिळा ला आहे. यामुळे गुन्हा नसताना कन्हान थानेदार विला स काळे यानी हेतुपुरसपर बाजीरावने हाथावर व हाता ने कानावर मारल्याने झालेल्या दुखापती च्या अन्याया विरूध्द गॅरेज चालक आंनंद नायडु हयानी पत्रपरिषद घेऊन कन्हान थानेदार विलास काळे विरूध्द गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी केली असुन न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्या चा इशारा दिला आहे. पत्रपरिषदेला कॉग्रेस कमेटी नागपुर ग्रामिण उपाध्यक्ष नरेश बर्वे, नगरपरिषद विरोधी गट नेता मनिष भिवगडे, माजी न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, महिला कग्रेस अध्यक्षा रिता बर्वे, नगरसेविका गुंफा तिडके, पुष्पा कावडकर, रेखा टोहणे, अमोल प्रसाद, प्रशांत मसार, सतिष भसारकर, रामचंद्र कुशवा ह, औसत शेख, नागेश्वर आकरे, अमित सिंग, प्रताप सिंह राजपुत, कुलदिप सिंग भंडारी, रोहीत माहुल, सुनिल आंबागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कौतुकास्पद ! भटकलेल्या 22 वर्षीय तरूणीला महिला पोलिसांनी सुखरूप घरी पोहोचवले

Thu Apr 28 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 28:-मुंबई वरून कामठी शहरात आलेल्या आणि भरकटलेल्या एका 22 वर्षीय तरुणीला नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर व शिपाई सविता शिंगाडे या पोलिसांनी सुखरूप पोहोचवले आहे. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामठी बस स्टँड चौकातील दुबे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com