बनावट स्टँम्प पेपर प्रकरणात तपासात कोर्टातील Cr.P.C. १६४ चे बयानही पोलीसानी नाकारून कळसच गाठला, न्यायालयाकडून सदर पोलिसांना कोर्ट अवमानना नोटीस

नागपुर – पोलीस स्टेशन सदर येथील अँड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या एका प्रकरणात मा. JMFC नागपूर न्यायालयाने न्यायालयाचा पुढील तपासाचा आदेशाचे पालन न केल्याने पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक आर आर महिपाळे यांना कोर्ट अवमानना अर्जावर नोटीस जारी करून उत्तर सदर करण्यास आदेशित केले आहे .

प्रकरण असे आहे कि , दि. ६.०४.२००६ रोजी सतीश उके यांनी धरमदास रामाणी याने बनावट स्टम्प पेपर तयार करून वापरला याबाबत तक्रार पोलीस उपायुक्त परी. क्र. २ आणि पोलीस स्टेशन सदर येथे नोंद्विली होती, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही परंतु धरमदास रामाणी याने त्याचा साथीदार गुड्डू उर्फ अनिल गयाप्रसाद मिश्रा व तुषार दलाल यांचे सोबत मिळून अँड. सतीश उके व इतर यांचे विरुद्ध जिल्हा न्यायालयात खंडणी मागिल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन सदर नागपूर येथे अप. क्र. ४६३/२००७ प्रमाणे दि. ११.१२.२००७ रोजी दाखल करून घेतला . यात गुड्डू मिश्रा याने तो रामाणी करिता स्टम्प पेपर विक्री करतो असे बयान दिले , यावर गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांचे Cr.P.C. १६४ चे बयानही पोलिसांनी मा. न्यायालयात नोंदवून घेतले होते . तपासात हि तक्रार खोटी असल्याचे दिसून आल्याने सदर पोलिसांनी “ब फायनल” न्यायालयात दाखल केले . “ब फायनल” यात गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांचे बयानाचे आधारे तपास करण्याचे निर्देश मा. न्यायालयाने दिले . बयानाप्रमाणे गुड्डू मिश्रा याचे स्टम्प विक्रीचे परवाना याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर व नागपूर ग्रामीण यांनी मागितली असता कोणताही परवाना त्यांना दिला नाही असे उत्तर मिळाले. यानंतर या प्रकरणात त्या बाबत कधी तपास करण्यात आला नाही व रामाणी व त्याचे साथीदार यांचेवर बनावट स्टम्प बाबत व खोटी तक्रार दिले कारवाई करण्यात आली नाही.

या प्रकरणात अँड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या अर्जावर दि. ५.१०.२०२० रोजी मा. JMFC न्यायालयाने पोलीस स्टेशन सदर नागपूर यांना पुढील तपास करण्याचे आदेश दिले . परंतु सदर पोलिसांनी मा. न्यायालयाचे आदेशाचे पालन न करता कसलाही तपास न करता दि. ८.१२.२०२० रोजी प्रकरण न्यायालयात परत केले. यावर न्यायालयाने त्यांना दि. ११.०१.२०२१ रोजी कोर्ट अवमानना नोटीस काढली यावर न्यायालयात PSI महिपाळे व PI देशमुख यांनी मा. न्यायालयास माफी मागितली आणि तपास करण्यास प्रकरण परत मागून घेतले . त्यानंतर नवीन पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व उपनिरीक्षक महिपाळे यांनी पुढील तपास न करता व मुळ स्टम्प पेपरचा कायदेशीरपणे शोध न घेता आणि तसेच बनावट स्टम्प पेपरचे टोळीला वाचविणे करीता गुड्डू मिश्रा व तुषार दलाल यांचे Cr.P.C. १६४ चे बयानही जे यापूर्वी पोलिसांनी मा. न्यायालयात नोंदवून घेतले होते ते सुद्धा तपासात नाकारून न्यायालयात खोटा अहवाल सादर केला . याप्रमाणे मा. न्यायालयाचे आदेशाचे पालन न करणे आणि मा. न्यायालयासच साक्षदारांनी Cr.P.C. १६४ चे बयान न्यायालयात नोद्विले नाही असे सांगितले असे लिहून खोटे ठरविले असे असे अनेक गैरप्रकार करून मा. न्यायालयाचा अवमान जाणीवपूर्वक केला , याचसोबत बनावट स्टम्प टोळीला वाचविणे करिता खोटा अहवाल सदर करून भा. दं. वी. चे कलम २१७, २१८ ,२१९ आणि १२०-ब प्रमाणे अपराधिक कृत्य केले करिता कारवाईस होनेस अर्ज अँड. सतीश उके यांनी मा. न्यायालयात सादर केला . यावर आज सुनावणी होवून मा. न्यायालयाने पोलीस स्टेशन सदरचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना नोटीस काढून उत्तर सादर करण्यास निर्देशित केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नेहरू युवा केंद्राव्दारे जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा संपन्न

Thu Dec 16 , 2021
भंडारा, दि. 16 : नेहरू युवा केंद्राव्दारे देशभक्ती व राष्ट्र निर्माण या विषयावर आधारित सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या विषयावरील जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा नुकतीच प्रगती कला महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र भंडाराच्या वतीने व राष्ट्रीय सेवा योजना, प्रगती महाविदयालयाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com