संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- वंचित बहुजन आघाडी कूसुंबी शाखेच्या वतीने कुसूंबी शाखा अध्यक्ष अक्षय लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली गट ग्रामपंचायत टेमसना यांना कुसुंबी गावा करिता स्मशानभूमी साठी निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने उपस्थीत वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ संयोजन समितीचे संयोजक भगवान भोंडे, कामठी तालुका संघटक राजेश ढोके, नागपुर शहराचे उपाध्यक्ष कमल अंसारी , वडोदा जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन लोखंडे, बिडगाव शाखा अध्यक्ष नयन जामगडे, बिडगाव शाखा प्रवक्ता सदानंद शेंडे, बिडगाव शाखा म.आ. महासचिव रिता जामगडे उपस्थित होते.
कुसुंबी येथे स्मशान भुमीसाठी शासनाने 5 लाख मंजूर केले व त्या ठिकाणी वडोदा जिल्हा परिषद सदस्य व बाल व महिला कल्याण सभापती अवंतिका लेकुरवारे, व टेमसना गट ग्रामपंचायत चे सरपंच अनिकेत शाहाने तसेच उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांनी गावातील नागरिकांच्या समोर उदघाटन केले.
पण काहीच दिवसात ते काम बंद केले. स्मशान भूमीच्याकामा करिता जे गड्डे खोदले होते ते JCP ने बुजवण्यात आले. आज त्याला 2 ते 3 महिने होत आहे पण त्या कामाला ग्रामपंचायतने अजून पर्यंत हात लावला नाही.
करिता वंचित बहुजन आघाडीने टेमसना गट ग्रामपंचायत चे उपसरपंच रामभाऊ खडसन यांना निवेदन दिले.
अन्यथा काम लवकरात लवकर चालू न झाल्यास वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी उपस्थित हिरालाल खुशवाह, गुणवंता काळे, ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रभाकर वाघ, मारोती पांडे, प्रविण राऊत, गुलाब बेले, प्रमोद मने, मयूर पाटील, मारोती पाटील, बबनराव सोनटक्के, अंकुश सोंडे, नितीन काकडे, राहुल काळे, भगवान मानकर, योगेश लोखंडे, सुनिल काकडे. इत्यादी असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.