कन्हान : – टेकाडी येथे श्रीराम नवमी व श्री हनुमान जयंती निमित्त परिसरात शोभायात्रा काढुन विविध कार्यक्रमाने श्रीराम नवमी थाटात साजरी करून श्री हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात करण्यात आली.
शनिवार (दि.९) एप्रिल २०२२ ला सायंकाळी श्री हनुमान मंदिर देवस्थान टेकाडी व्दारे मंदीरात पुजा अर्चना करून श्रीराम रथ जीवित झाकी, लेज़िम, डि जे, बँड, अखाडा आणि पालखी सह शोभायात्रा काढ ण्यात आली. शोभायात्रा संपुर्ण गाव परिसरात भम्रण करून शोभायात्रेचे हनुमान मंदिर परिसरात समापन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी रविवार (दि.१०) ला श्री हनुमान मंदिर टेकाडी येथे श्रीराम नवमी उत्सव साजरा करून श्री हनुमान जयंती निमित्त घट स्थापना करून अखंड हरिनाम सप्ताहा ची श्री देवमनजी हुड भजन मंडळ टेकाडी यांचे भजना च्या कार्यक्रमाने भव्य दिव्य सुरूवात करण्यात आली. गोपिचद्रं गुरधे भजन मंडळ, जय दुर्गा भजन मंडळ, अतुल खेडकर शिवशक्ति भजन मंडळ, आरती भजन मंडळ, जय रघुनंदन भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ यांचे अखंड, अविरत रामनाम भजन सात दिवस २४ × ७ तास करून श्री हनुमान जयंती च्या पावन पर्वावर पुजा अर्चना व भव्य महाआरती व दहिकाला कार्यक्रम करून भव्य महाप्रसाद चे वितरण करण्यात येईल. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री हनुमान मंदीर देवस्थान कमेटी व समस्थ ग्रामवासी सहकार्य करित आहे. 

