सावनेर : स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय शिक्षक पर्व, रा. तू. म. नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव आणि जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्याने रोपवाटप आणि वृक्ष लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागातर्फे “लो कॉस्ट अँड इकोफ्रेंडली नर्सरी प्रॅक्टिसेस” या उपक्रमाअंतर्गत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पराग निमिशे तर डॉ. सुवर्णा पाटील, तायवाडे महाविद्यालय कोराडी, विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांनी केले. यात शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त सामाजिक उपक्रमांचे नियमित आणि प्रभावी आयोजन व त्याचे महत्व विषद केले. अतिथी डॉ. पाटील यांनी या विभागातील उपक्रमाची प्रसंशा केली आणि सध्याच्या काळात पर्यावरण साक्षरतेची सुद्धा विशेष गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माण केलेल्या रोपांचे शंभर विद्यार्थ्यांना याप्रसंगी वाटप करण्यात आले आणि वृक्षलागवड करून जतन करण्याचा संकल्प घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण दुलारे तर आभारप्रदर्शन डॉ. प्रा. प्रदीप आठवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. प्रा. प्रशांत डबरासे, प्रा. रवींद्र भाके, प्रा. परीक्षित चौधरी, विलास सोहागपुरे, अनुराधा चव्हाण, साक्षी धुंदे, केतकी कडू आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
शिक्षक पर्व आणि विद्यापीठ शताब्दी महोत्सव कार्यक्रम..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com