शिक्षकच करतात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण – दिनेश चोखारे

– शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकाचा भद्रावती तालुक्यातील कोंढा, मांजरी, नंदोरी (बु. ), डोगंरगाव(खडी) येथील शाळेत जाऊन सत्कार सप्ताह सुरु

चंद्रपूर :- शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात कारण ते विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक वर्षांमध्ये सर्वात प्रभावशाली व्यक्ती असतात. वर्गात नेतृत्वाची भूमिका दिल्यास विद्यार्थ्यांचा आत्मबल आणि आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास असलेले विद्यार्थी आव्हानांना तोंड देण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या समुदायांमध्ये सक्रियपणे योगदान देण्यासाठी अधिक सुसज्ज होतात असे मत जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी सांगितले .

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे कौतुक करण्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकाचा सत्कार सप्ताह सुरु केला असुन निमित्ताने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचा सत्कार त्यांच्या शाळेत जाऊन मंगळवार दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आला. यावेळी भद्रावती तालुक्यातील कोंढा, मांजरी, नंदोरी (बु. ), डोगंरगाव(खडी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा सहभाग असून येथील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांची सर्व ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ते म्हणाले कि, शिक्षक हे आपल्या समाजाचे आवश्यक घटक आहेत. ते ज्ञानाचे आधारस्तंभ आहेत, आमच्या मुलांचे भविष्य घडवत आहेत- ते शिक्षक, मार्गदर्शक, मार्गदर्शक आणि प्रेरणा आहेत. शिक्षकांच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत ज्या वर्गाच्या पलीकडे विस्तारतात, शैक्षणिक अनुभवाला आकार देतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वाढीस चालना देतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रवासात प्रकाश टाकत आहेत, जगाबद्दलची त्यांची समज तयार करत असतो आणि त्यात असलेल्या संधींचे अनावरण करत असतो. जसजसे विद्यार्थी वाढतात आणि असंख्य शक्यतांचा शोध घेतात, तसतसे शिक्षक त्यांच्या जिज्ञासा आणि महत्त्वाकांक्षा वाढवतात. हा प्रभाव शिक्षकांना आपल्या समाजाचा महत्त्वाचा घटक बनवतो असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंढा येथे माजी सरपंच अजय मत्ते, शाळा समितीचे अध्यक्ष विजय मत्ते, सामाजिक कार्यकर्ते महेश मत्ते, शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद देशमुख, हर्षकुमार उराडे, आशिष चुनारकर, शिक्षिका नाजिया कुरेशी , भाग्यश्री कामडी, माजी तालुका अध्यक्ष शंकर खैरे यांची तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरी येथे शाळा समिती अध्यक्ष सचिन पाचभाई, मुख्याध्यापिका बालमित्रा कुलसंगे, शिक्षिका स्मिता ठाकरे, सुनीता झाडे , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंदोरी (बु. ) येथे शाळा समिती अध्यक्ष घनशाम ढवस, मुख्याध्यपक मनोहर राजगिरे , शिक्षक विजय सातपुते, शिक्षिका विजया भोमले, शिक्षिका माधुरी गिरडकर, शिक्षिका दातारकर, शिक्षिका विद्या वीरमलवार , तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोगंरगाव(खडी) येथे शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश आस्कर, मुख्याधापक विनोद गौरकार शिक्षक प्रवीण गोरख , प्रवीण बेलखुंडे यांची उपस्थिती होती.

यावेळी भद्रावती तालुक्यातील कोंढा, मांजरी, नंदोरी (बु. ), डोगंरगाव(खडी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षक, शिक्षिकांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी गावातील नागरीक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; राज्यपालांकडून बाप्पाला निरोप

Thu Sep 12 , 2024
मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. ११) गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!