नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक.

नागपूर – नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा, शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये होणा-या नियमित लसीकरणासंदर्भात मंगळवारी (ता.३०) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभापती सभागृहामध्ये झालेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. बकुल पांडे, डॉ. मिनाक्षी माने, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. मेघा जैतवार, डॉ. विजय तिवारी, डॉ. अतीक खान, डॉ. सुनील कांबळे, दीपंकर भिवगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) डॉ. महेश जागुलवार, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डॉ. ज्योत्सना देशमुख, दीपाली नागरे आदी उपस्थित होते.

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला. सादरीकरणाद्वारे त्यांनी शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी झोन वैद्यकीय आरोग्य अधिका-यांना दिले. नियमित लसीकरणासंदर्भात ‘मायक्रो प्लॅनिंग’ करणे, झोननिहाय खासगी डॉक्टरांची बैठक घेणे आदी निर्देशही यावेळी देण्यात आले.

नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जी बालके वंचित राहिली असतील अशा बालकांचे लसीकरण व्हावे या दृष्टीने प्रयत्न करण्याचेही निर्देश देण्यात आले. याशिवाय पालकांनीही त्यांच्या बाळांचे लसीकरण झाले नसल्यास त्यांनी आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाउन ते करून घ्यावे किंवा आपल्या नियमित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अभ्यासातील सातत्य व नियोजनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रवेशाचा मार्ग सुकर होतो - जिल्हाधिकारी संदीप कदम

Wed Aug 31 , 2022
भंडारा : अभ्यासातील सातत्य, वेळेचे योग्य नियोजन , अभ्यासक्रमाची उजळणी व मेहनत करण्याची अफाट वृत्ती विद्यार्थ्यांनी ठेवल्यास नागरी सेवा परीक्षेत नक्की यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज नागपूर येथे केले. जुन्या मॉरिस कॉलेज मधील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रसंचालक डॉ. प्रमोद लाखे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!