पावनगाव ग्रामपंचायत ला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत सन 2022-23 चा तालुका स्तरावरील स्मार्ट ग्राम पुरस्कार हा कामठी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत असणाऱ्या पावनगाव गावाला मिळाला आहे.

कामठी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पावनगाव ग्रामपंचायत तर्फे गावात विविध शासकीय योजना तसेच कामे अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्या जात आहेत त्यामुळे हे गाव आदर्श गाव ठरले असताना या गावाला सन 2022-23 च्या आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत सन 2022-23 च्या स्मार्टग्रामच्या तालुका स्तरावरील पुरस्कारासाठी या गावाची निवड झाली आहे. त्यामुळे काल 28 फेब्रुवारीला नागपूर जिल्हापरिषद च्या वनामती सभागृहात गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले, सरपंच नेहा किरण राऊत , सचिव विकास सहारे, विस्तार अधिकारी मनीष दिघाडे,व पावनगाव ग्रा प सदस्यगण यांना जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे ,उपाध्यक्ष कुंदा राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ काळोदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सम्माणीत करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा शुभारंभ

Thu Feb 29 , 2024
यवतमाळ :-  वर्धा-यवतमाळ- नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडाची शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनला प्रधानमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून डिजिटली उद्घाटन केले. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खा.रामदास तडस उपस्थित होते. वर्धा –यवतमाळ- नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग झाला असून आज दि. 28 फेब्रुवारी रोजी या मार्गावरील वर्धा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com