– वर्षगाठ महोत्सव उत्साहात
बेला :- राग,लोभ,द्वेष,मत्सर,अहंकार असे मानवाचे मनातील षडरुपी विकार काढण्यासाठी महा कुंभमेळ्याचे ज्ञानरूपी पाण्याने शाही स्नान करावे. असे मौलिक विचार समर्थ राधेश्यामस्वामी यांनी व्यक्त केले. ते बेला येथील भगवान कोलबास्वामी पिठाचे वतीने खापा येथील कन्हान नदीचे गंगातीरी डोंगेघाट येथे आयोजित गुरुस्वामी वर्षगाठ महोत्सवात बोलत होते. अध्यक्षस्थानी वृंदावन तीर्थक्षेत्राचे महंत दिलीप दास महाराज होते. माजी आमदार गिरीश व्यास,ह भ प क्षीरसागर महाराज (बुलढाणा) यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मंचावरील सर्व अतिथींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निशुल्क आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यासाठी जेष्ठ समाजसेवक डॉ. रत्नाकर धामणकर, डॉ.कल्पना धामणकर, डॉ. गणेश सोरमारे,डॉ. गवळी यांनी अमूल्य सेवा दिली व गोरगरिबांवर निशुल्क औषधोपचार केले. ह भ प पलूकर महाराज यांचे गोपालकाल्याचे किर्तन झाले. समर्थ राधेश्यामस्वामींच्या शिष्या ह भ प लता देशमुख यांचे सुद्धा सुश्राव्य कीर्तन झाले. ह भ प टोंगे पाटील महाराज यांनी एकादशीचे महात्म्यावर कीर्तन केले. तिघांचेही कीर्तनाने श्रोते,रसिक मंत्रमुग्ध झाले. तीन दिवशीय महोत्सवाची मनोहारी पालखी दिंडी यात्रा, भव्य महाप्रसाद व अनेक धार्मिक कार्यक्रमाने थाटात सांगता झाली. यशस्वीतेसाठी शुक्रकांत, रमेशराव व शालु मेंडुले, लक्ष्मण खोडके, कल्पना खोडके, लता देशमुख गुरु माऊली रमादेवी, वेनु कुंभारे,सुशील धार्मिक, रामराव धार्मिक,शोभाब हिनीकर,मधुकरणी पवनीकर माणिकराव देशमुख, हर्ष उपासना साधू मुरमुरे कृष्णा मेंडुले प्रकाश बुरांडे व अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. चंद्रकांत गिरकर यांनी सूत्रसंचालन केले.