नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ५६व्या पुण्यतिथी निमित्त शनिवारी (ता. २६) शंकर नगर चौक स्थित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला महापौर दयाशंकर तिवारी, झोन सभापती सुनील हिरणवार व ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
यावेळी सावरकर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, महासचिव अजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष शिरीष दामले, सुनील कीटकरू, सुनील उईके, रवी सावरकर, अनिल देशपांडे, बाबू गवळी, चंद्रकांत शर्मा, सुनील उमाठे, कार्तिक मदनकर, मुकुंद पाचखेडे, दिनेश खुरजे, अजय आचार्य, प्रमोद सोवनी आदी उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)