स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे धडक कारवाई  

 नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.22) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट नं.72, शंकरनगर येथील सुरेन्द्र वाधवा यांच्याविरुध्द बांधकामादरम्यान वाहन भरुन मनपाची सांडपाण्याची लाईन फोडल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत जुना नंदनवन, जगनाडे चैक येथील समिर बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्रनगर येथील सोमवंशी कन्स्ट्रक्शन यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न.07, नवा नकाशा येथील साईनाथ कॉम्प्लेक्स यांच्याविरुध्द कॉम्प्लेक्सचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयशा नसीम, इशांक तेलंग, अभिमन्यू कुशवाह यांची राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Fri Dec 23 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ,१२, वी कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या आयशा नसीम, इशांक तेलंग, अभिमन्यू कुशवाह या तीन विद्यार्थ्याची निवड राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांनी काढलेल्या प्रसिध्दीला दिलेल्या पत्रातून कळविले आहे. आधी या तीनही विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर द्वारा आयोजित विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!