स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार ता. 16) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून ‍मे. देवीप्रभा वक्रतुंड स्किम, बाजीप्रभु नगर, नागपूर यांच्यावर 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच टॉस कॅफे, बजाज नगर यांच्यावर हॉटेलचा कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला.

गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत हर्ष किराणा स्टोर्स, सब्जी मंडी इतवारी या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. व अश्विन स्टडी सर्कल, टिमकी, मोमीनपुरा या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेहाडीया चौक ते काँग्रेस नगर रास्ता वाहतुकीस प्रतिबंधित

Tue May 16 , 2023
– ३१ ऑक्टोबर पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे मेहाडीया चौक ते कॉंग्रेस नगर आनंद मंगल कार्यालयापर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामाकरीता मेहाडीया चौक ते कॉंग्रेस नगर आनंद मंगल कार्यालयापर्यंतची रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. हे आदेश ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अमलांत राहील, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com