स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.२९ ) ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. महालक्ष्मी रिऍलीटीज, पांडे ले आऊट, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. छोटी लाहोरी बार अँड रेस्टोरेंट, खरे टाउन, नागपूर यांच्यावर रेस्टोरेंटचा कचरा चेंबरमध्ये टाकल्याप्रकरणी कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

हनुमाननगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. आशिष पतंग भंडार, हुडकेश्वर रोड नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. खापेकर किराणा, राणी दुर्गावती चौक नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय देयके ई-बिल प्रणालीव्दारेच कोषागारात सादर करा  - आशिष कुमार सिंह

Fri Dec 29 , 2023
– ई-बिल, ई-व्हाऊचर प्रणालीचे उद्घाटन नागपूर :-  विविध शासकीय कार्यालयातील दुरध्वनी, विद्युत आदि देयके ई-बिल प्रणालीव्दारे कोषागारात सादर करणे सुलभ झाले असुन सर्वच देयके या प्रणालीव्दारे स्विकारण्यात येणार आहेत. ई-बिल प्रणालीव्दारे कोषागारात देयके सादर करुन या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा कोषागार कार्यालयात ई-बिल प्रणाली, ई-बिल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com