नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.21) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पार्क लेन, जागृती कॉलोनी, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विजय फुलझले, अंबाझरी रोड, नागपूर यांच्यावर कचरा आणि मलबा अनधिकृतपणे टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व मे. वेडींग वर्ल्ड ॲडव्हरटाईसमेंट, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. भोयर रेस्टॉरेंट, चिंचभवन, नागपूर यांच्यावर रेस्टॉरंटचा कचरा रस्त्याच्या कडेला पसरविल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे राजु जयराम पाटील, शेंडे नगर, नागपूर यांच्यावर बोरवेलच्या मातीने सिवर लाईन ब्लॉक झाल्याबाबत 10 हजार दंड वसूल करण्यात आला. आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विधान शर्मा, सी.आय.डी. ऑफीस रोड, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत कचरा बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.