स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शक्रवार (ता.28) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ओरा फाईन ज्वेलरी, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अशोका रेस्टॉरेंट, गणेशपेठ, नागपूर यांच्यावर घरातील उपकरणे धुतल्याने फूटपाथ आणि परिसरात पाणी पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जित पिन्नाकल स्पोकन इग्लिश, दिघोरी नरसाळा रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे संजय बत्रा, गोलीबार चौक, नागपूर यांच्यावर परवानगीशिवाय चॅम्पर तोडल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. यापरी स्विटस, इतवारी रेल्वे स्टेशन, नागपूर व न्यानवे प्लास्टीक, जामदारवाडी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हिरा पब्लीक स्कुल, जाफर नगर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून 10 हजार व मे. दिशा कंम्प्युटर क्लासेस, मंगलवारी बाजार, नागपूर यांच्यावर 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दत्ता सामंत हत्याकांड में छोटा राजन बरी

Sat Jul 29 , 2023
– 26 साल बाद फैसला मुंबई :- सीबीआई की एक विशेष अदालत ने गैंगस्टर छोटा राजन को 1997 में ट्रेड यूनियन नेता दत्ता सामंत की हत्या से जुड़े एक मामले में सबूतों के अभाव में शुक्रवार को बरी कर दिया। सूत्रों ने यह जानकारी दी। सूत्रों के अनुसार अदालत ने कहा कि यह साबित करने के लिए रिकॉर्ड पर कुछ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com