नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार (ता.27) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. देविका ऑर्चीड, लक्ष्मीनगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. FUR निवास, बोरगाव चौक, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सवेरा डेव्हलपर्स, हनुमान नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जासवानी किराणा शॉप, इतवारी, नागपूर व मे. निपाने क्लॉथ स्टोर्स, मस्कासाथ, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.