स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.19) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. चिमठानवाला ऑर्थोपेडीक हॉस्पीटल, सिताबर्डी, नागपूर यांच्यावर औषधाच्या रिकाम्या बाटल्या जवळपासच्या परिसरात टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. व मे. वरीना रियलिटीस, आकांशा सोसायटी, दाभा, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. इनक्रेडीबल किडस दि प्ले स्कुल, मानेवाडा नागपूर व मे. परंपरा नॅचुरलर्स, न्यु ओमकार नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जय हरे क्रिष्णा, कॉटन मार्केट, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. राधेश्याम किराणा स्टोर्स, गांजाखेत, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पौनिकर किराणा शॉप, राणी दुर्गावती चौक, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 65प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Thu Jul 20 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (19) रोजी शोध पथकाने 89 प्रकरणांची नोंद करून 46200 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com