नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.04) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे डायग्नो प्लस हेल्थ सर्विस, गिरीपेठ, नागपूर यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव कचरा आढळून आल्याबद्दल कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मास्टरमाईंड अब्कस टयुशन क्लासेस, श्रावश्री नगर, दिघोरी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. चंदु किराणा शॉप, इतवारी, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच डॉ. मोहसिम कसिम, गांजाखेत चौक, नागपूर यांच्यावर क्लिनीकचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रुपेश स्विटस, नंदगिरी रोड, ठक्करग्राम, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सॅनेर्जी हॉस्पीटल, अवस्थी चौक, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com