नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुध्वार ता. 21) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. प्लस कोचिंग सेंटर, पिपला फाटा हुडकेश्वर रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला.
गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. तुषार डेअरी, सिरसपेठ, गांधीबाग, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सुमित मोजे, धामयान नगर, नारा, नागपूर यांच्यावर घराचे बांधकाम करीत असतांना डे्नेज लाईन तोडल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.