नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.31) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून मे. लिला अपार्टमेंट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर यांच्यावर 10 हजार रुपये व मे. हब इन्फ्रा, राजीव नगर, नागपूर यांच्यावर 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हल्दीराम ओम इंन्डस्ट्रीस प्रा. लि. सिताबर्डी, नागपूर यांच्यावर हरित न्यायाधिकरणाच्या अंतर्गत अन्नाच्या कचऱ्याने सीवर लाइन चेंबरमध्ये अडथळा निर्माण झाल्याबाबत 10 हजार दंड वसूल करण्यात आला.धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ब्रम्हा बार ॲड रेस्टॉरेंट, मानेवाडा रिंग रोड, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार दंड वसूल करण्यात आला.मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे अब्दुल लतिफ, छावनी, नागपूर यांच्यावर बांधकामाचे पाणी परवानगीशिवाय ड्रेनेज लाईनमध्ये टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच मे. रुघवानी बिल्डर्स, आदर्श कॉलोनी, टी पॉईंट नारा यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com